
नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र महिला व बाल विभागाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28 जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये एवढी रक्कम हि सरळ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
ही योजना मध्यप्रदेश सरकारच्या Meri Ladli Behna Yojana या धर्तीवर महाराष्ट्रात Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana या नावाने सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
अर्ज करण्याची दिनांक । Application date for Ladki Bahin Yojana
1 जुलै 2024पासून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात येतील. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यानाची एकत्रित रक्कम रुपये 3000 हि लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
योजनेसाठी कोण पात्र आहे? । Who is eligible for Ladki Bahin Yojana?
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष असणाऱ्या वयोगटातील विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परितक्त्या महिला आणि निराधार महिला पात्र असतील. तसेच एका कुटुंबातील केवळ एकाच अविवाहित महिला पात्र असणार आहे. परराज्यात जन्मलेली परंतु महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केलेली महिलासुद्धा या योजेच्या लाभासाठी पात्र असणार आहे.
योजनेसाठी कोण अपात्र आहे? । Who is not eligible for Ladki Bahin Yojana
जर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. तर ती महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्रे । Ladki Bahin Yojana Document LIst in Marathi
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराचे हमीपत्र
- बँक पासबुक
1. आधार कार्ड – अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड (दोन्ही बाजू असणे आवश्यक आहे)
2. अधिवास प्रमाणपत्र –
महाराष्ट्र राज्याचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी, लाभार्थी महिलेचे १५ वर्षा पूर्वीचे १) रेशनकार्ड २) मतदार ओळखपत्र ३) शाळा सोडल्याचा दाखला ४) जन्म दाखला असणे बंधनकारक आहे. वरील चारपैकी एक तरी कागदपत्र असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
परराज्यात जन्म झालेल्या अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी लागणारी कागदपत्रे
जर अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर परराज्यात झाला असेल तर अशा स्थिती जर त्या महिलेचा विवाह महाराष्ट्र राज्यातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर झालेला असेल. तर त्या महिलेकडे खालील कागदपत्रे असतील तर ती Mazi Ladki Bahin Yojana साठी अर्ज करू शकते.
- पतीचा जन्म दाखला
- पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / पतीचा शाळा सोडवल्याचा दाखला
- पतीचे अधिवास प्रमाणपत्र
वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र हे जर लाभार्थी महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर / पर राज्यात झाला असेल तर ग्राह्य धरले जाईल. पतीचे सर्व कागदपत्रे हि महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहेत. जर पतीची कागदपत्रे महाराष्ट्र राज्याबाहेरील असतील तर ती अर्जदार महिला Ladki Bahin Yojana साठी पात्र असणार नाही.
3. उत्पन्न प्रमाणपत्र –
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा आधीच लाखांपेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड (शिधापत्रिका) धारकांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या अटी पासून वगळण्यात आले आहे. सादर लाभार्थी महिलांचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड / शिधापत्रिका हे कागदपत्र ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करायचे आहे.
4. अर्जदाराचे हमीपत्र –
अर्ज करणाऱ्या महिलाना अर्जासोबत अर्ज करताना एक हमी पत्र अपलोड करायचे आहे. हे हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्ही सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा नारीशक्ती ऍपमध्ये हे हमीपत्र देण्यात आले आहे. त्याचबरोबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर सुद्धा हे हमीपत्र देण्यात आले आहे.
हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
5. बँक पासबुक –
अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे. बँकेतील अकाऊंट हे चालू असावे. बँक पासबुक आणि आधार कार्ड यावरील नाव सारखेच असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही ते दुरुस्त करावे व नंतर अर्ज करावा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज । Online form for Mazi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल पोर्टलला भेट द्यायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारद्वारे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत हे अँप बनविण्यात आले आहे. याद्वारेसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
योजनेची उद्दिष्टे । Goal of Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासाठी व त्याचबरोबर कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने ladki bahin yojana नेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ४६००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
FAQ (Frequently Asked Questions) –
१. Ladki Bahin Yojana age limit in marathi?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वय मर्यादा हि २१ ते ६० वर्ष आहे.
२.how to apply online form Mazi Ladki Bahin Yojana?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. जसे कि अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा नारीशक्ती या महाराष्ट्र सरकारच्या ऍपद्वारे अर्ज सादर करू शकता.
३. Ladki bahin yojana form fees?
या योजनेसाठी अर्ज करणे अगदी निशुल्क आहे. जर कोणताही सरकारी व्यक्ती तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क मागू शकत नाही. जर त्या व्यक्तीने अर्ज भरण्यासाठी पैसे मागितले तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करू शकता.
४. Whar are documents required for Ladki Bahin Yojana?
या योजनेसाठी अर्ज भरताना तुम्हाला आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, हमीपत्र, बँक पासबुक हि कागदपत्रे लागणार आहेत.
Leave a Reply