नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार योजना 2024 संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये कोण कोणते लाभ तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर यासाठी आवश्यक ती कागदपत्रे कोणती लागतात आणि तुम्हाला हा अर्ज कोठे करायचा आहे. हे संपूर्ण डिटेल्स आजच्या या लेखात पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख वाचा. तुम्हाला पूर्ण माहिती यामध्ये मिळेल याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि तिथे तुमचे प्रश्न विचारू शकतात.
बांधकाम कामगार योजना 2024 | Bandhkam Kamgar Nondani in Marathi
आता आपण पाहूया की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते.

मित्रांनो, बांधकाम कामगार योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक आणि बांधकाम ठेकेदार यांचे सही असलेले आणि शिक्का असलेले एक अर्ज तुम्हाला जोडायचा आहे. आणि तो अर्ज तो अर्ज तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे ऑफिस आहे त्यामध्ये तुम्हाला जमा करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार आहे हे ग्राह्य धरलेच आहे. आणि नोंदणी केली जाईल त्यानंतर तुम्हाला ही खाली दिलेल्या सर्व योजनांचा लाभ मिळेल.
बांधकाम कामगार योजना यासाठी अर्ज करताना तुम्ही कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार हे काम केले असल्याचा दाखला जोडायचा आहे.
बांधकाम कामगार या योजनेचा लाभार्थी झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो हे आपण पाहूया | Bandhkam Kamgar Nondani Benefits
सामाजिक सुरक्षा –
या अंतर्गत लाभ मिळणारी पहिली योजना म्हणजे सामाजिक सुरक्षा.
सामाजिक सुरक्षा या अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिकृतीसाठी तीस हजार रुपये एवढे मिळतात त्यानंतर मध्यान भोजन योजना सुद्धा यासाठी लागू आहे.
मोफत विमा –
या योजनेसाठी नाव नोंदल्यानंतर तुम्हाला मोफत विमा सुद्धा मिळतो यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा लाभ तुम्हाला घेता येतो.
त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र असणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ ही मिळतो.
शैक्षणिक सुविधा –
या योजनेअंतर्गत जे लाभ मिळतात ते फक्त बांधकाम काम नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू होतात.
या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रुपये 2500 व इयत्ता दहावी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये एवढे आर्थिक लाभ मिळतो. (अट – किमान 75% अथवा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे)
इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजार रुपये एवढी आर्थिक मदत मिळते.
इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये दहा हजार एवढी रक्कम आणि पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रुपये दोन हजार वीस हजार रुपये एवढी रक्कम मिळते या योजनेसाठी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेल्या पत्नीलाही ही रक्कम मिळते.
त्याचबरोबर वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी रुपये एक लाख एवढे अभियांत्रिकी पदवी करता प्रति वर्ष रुपये 60 हजार एवढे आणि आर्थिक मदत मिळते.
बांधकाम कामगार नोंदणी केलेल्या कामगाराच्या दोन पाल्यांना एमएस-सीआयटी शिक्षणाच्या संपूर्ण शुल्काची प्रतिकृती केली जाते.
लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आरोग्यविषयक लाभ | Bandhkam Kamgar Nondani Arogya Yojana
बांधकाम कामगार नोंदणी यांनी केलेले आहे त्यांना आरोग्य विषयक लाभ सुद्धा मिळतात यामध्ये नैसर्गिक परिस्थितीसाठी रुपये 15000 एवढे आणि शस्त्रक्रियेद्वारे जर प्रसिद्धी झाले असेल तर रुपये वीस हजार प्रत्येकी दोन जीवितांसाठी दिले जातात.
गंभीर आजाराच्या उपचारार्थ रुपये एक लाख हे लाभार्थी कामगार व त्याच्या किंवा तिच्या कुटुंबीयांना दिले जातात.
जर एका मुलीचा जन्म नंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे ती 18 वर्षाची असे होईपर्यंत रुपये एक लाख एवढे मुदत बंद ठेव राष्ट्रीयकृत बँकेमध्ये केली जाते.
जर बांधकाम कामगार आज 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला दोन लाख रुपये एवढी आर्थिक मदत मिळते.
त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सर्वच्या सर्व लांब बांधकाम कामगार नोंदणी केलेल्या कामगारास मिळतात त्याचबरोबर वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय किंवा निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडले तर सर्वच्या सर्व खर्च दिला जातो.
आर्थिक लाभ | Bandhkam Kamgar Nondani Financial Benefit
या योजनेअंतर्गत कामगाराला आर्थिक लोक सुद्धा मिळतो यामध्ये जर कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला तर त्याला पाच लाख रुपये एवढी रक्कम त्याच्या कायदेशीर वारसास मिळते.
जर कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये एवढी मदत कायदेशीर वारसास मिळते.
त्याचबरोबर अटल बांधकाम कामगार आवाज या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते जे की रुपये दोन लाख एवढे आहे.
जर कामगार ग्रामीण भागात असेल तर अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण योजनेअंतर्गत रुपये दोन लाख एवढे अर्थसहाय्य मिळते.
कामगाराचा मृत्यू झालास तर त्याच्या विधवा पत्नीस किंवा स्त्री कामगाराच्या विदुरुपतीस 24 हजार रुपये एवढे पाच वर्षांकरिता मिळतात.
त्याचबरोबर गृह कर्जावरील रुपये सहा लाख पर्यंतची रक्कम आहे ती व्याज मुक्त मिळते किंवा रुपये दोन लाख एवढे तुम्हाला अर्थसहाय्य दिले जाते.
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार हे नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कोणत्याही ऑफिसमध्ये करू शकता आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र फॉर्म उपलब्ध आहे तो फॉर्म भरून तुम्हाला ऑफिसमध्ये सबमिट करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला जी काही रक्कम असेल किंवा त्या योजनेचा फायदा आहे तो तुम्हाला थेट मिळणार आहे.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी अर्ज कोठे करायचा | Bandhkam Kamgar Nondani Form
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळाला भेट देऊन. फॉर्म डाऊनलोड करावा. आणि तो योग्य रित्या भरून, बांधकाम कामगार मंडळाच्या ऑफिसमध्ये द्यावा. त्यानंतर तुमची नोंद Bandhkam Kamgar अशी झाल्यावर तुम्हाला मीजद्वरे कळविण्यात येईल.
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Leave a Reply